
राजापूर :- पाचल ग्रामपंचायतीचे उपसरपंच आत्माराम सुतार यांनी आपल्या कानशिलात लगावली तसेच अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार पाचल ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी सुभाष काळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जुलै रोजी सकाळी ते कार्यालयात हजर असताना स्ट्रीट लाईट संदर्भात उपसरपंचांशी चर्चा सुरू होती. यावेळी शिव्या का दिल्या, अशी विचारणा केली असता उपसरपंच आत्माराम सुतार यांनी अचानक आपल्या कानाखाली लगावली व अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
तक्रारीमध्ये असेही नमूद आहे की, १२ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कामासंदर्भात फोनवर बोलत असताना सुतार यांनी त्यांना आईवरून अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ केली.

यासंबंधी जाब विचारल्यावर कार्यालयातच मारहाण करण्यात आल्याचा आरोप सुभाष काळे यांनी केला आहे. तसेच उपसरपंच सुतार यांच्याकडून वारंवार शिवीगाळ व जातीवाचक अपमान केला जात असल्याचे नमूद करून संबधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
