ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन.

Spread the love

२४ जुलै/मुंबई -ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर( वय -८८) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका , सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही ते झळकले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page