
खेड बस स्थानकात लागलेल्या खेड किल्लेमाची बस मध्ये घडला प्रकार
खेड (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकामध्ये खेड ते किल्ले माची या लोकल एसटी बस च्या टपावर अक्षरशः भलामोठा साप असल्याने प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली, गजबजलेल्या खेड बस स्थानकात हा प्रकार घडला , हरण टोळ म्हणजेच टाळूफोड्या जातीचा हा विषारी हिरव्या रंगाचा साप थेट एसटी बसच्या टपावर निदर्शनास आल्याने, एसटी बस मधील सर्व प्रवाशांनी साप आला .. साप आला असा आरडा ओरड करत स्थानकातील नियंत्रण कक्षात धाव घेतली, त्यानंतर सर्प मित्रांना बोलावण्यात आले, व त्या विषारी सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले,
सुट्ट्या असल्याने बस स्थानकात आणि सर्व एसटी बस मध्ये मोठी गर्दी आहे त्यात एसटी च्या टपावर साप पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती . ग्रामीण भागात घनदाट झाडीमध्ये कदाचित झाडावरून हा विषारी साप पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे एसटी च्या अधिकाऱ्यांनी सर्पमित्र ओमकार चिखले याला बोलावून हा साप सुरक्षित पकडला