
आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही, असाच एक सण दोन तो म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ‘होळी.’ देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.
विनंती – होळी नक्की साजरी करा पण कुठलेही झाडे तोडून साजरी करण्यापेक्षा जवळच्या गोशाळेतून गवऱ्या किंवा गोमय लाकडी(गाईच्या शेणापासून बनवली जाणारी छोटी छोटी लाकडे) यावर्षी वापरा म्हणजे पर्यावरणाला नुकसान होणार नाही, या मुळे पर्यावरणातील हानिकारक सुक्ष कीटक नष्ट होतील. व गो शाळेला देखील याचा फायदाच होईल. आता हा प्रश्न पडेल आणायचे कुठून थोडस शोधावे लागेल पण होळी दहन केल्या नंतर चेहऱ्यावर जे समाधान असेल ते मात्र अमूल्य असेल.
दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच.
जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाची गोस्ट आपल्याला माहितीच असेल. भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला.
आपणास व आपल्या परिवारास सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा