अत्याधुनिक नायट्रोजन पॅकिंग मशिनचा प्रशांत यादव यांच्या हस्ते शुभारंभ
चिपळूण : वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या मशिनरीमध्ये आणखी एक नवीन मशिन दाखल झाली. स्वीट्सच्या पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन पॅकिंग मशिनचा आज सायंकाळी वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभारंभ करण्यात आला.
वाशिष्ठी डेअरीच्या पेढे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या खास पसंतीस उतरले आहेत. हे पेढे कोकणाच्या बाहेर मेट्रो सिटीतही उपलब्ध व्हावेत, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे पेढे आणि सोबतच काजू कतली, बर्फी यांसह विविध प्रकारचे स्वीट प्रॉडक्ट्स अर्थात मिठाई या अत्याधुनिक मशिनद्वारे पॅकिंग केले जाणार आहेत आणि ते विक्रीसाठी मेट्रो सिटीमध्ये पाठवले जाणार आहेत. यामुळे वाशिष्ठीची उत्पादने आता मेट्रो सिटीपर्यंत पोहोचणार आहेत.
या मशिनच्या शुभारंभावेळी वाशिष्ठी डेअरीचे जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, मॅनेजर प्रदीप मगदूम, एरिया सेल्स मॅनेजर तानाजी निंबाळकर, स्वप्नील पाटील यांच्यासह डेअरीचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.