
चिपळूण (प्रतिनिधी): श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, चिपळूण येथे दिनांक ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या कालावधीत परमपूज्य श्री स्वामीसुत महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या उत्सवात भक्तांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाचा प्रारंभ बुधवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वीणापूजनाने होणार आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजता श्री स्वामी पाठ व आरती, तसेच रात्री ९.३० वाजता पंचपदी भजन होईल.
विशेष कार्यक्रमांत बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या शिष्या सौ. निहाली गद्रे ठाकूरदेसाई (गोवा) यांचे सुश्राव्य गायन आयोजित करण्यात आले आहे.

गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री गोपाळबुवा केळकर विरचित करुणा स्तोत्र, श्रीदत्त भावांजली व श्रीस्वामी नामपाठाचे सामुदायिक पठण होणार आहे.
शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता ह.भ.प. श्री. चिन्मय देशपांडे (पुणे) यांचे भावपूर्ण कीर्तन होईल.
शनिवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सांगतेचे भजन व वीणापूजन होईल. यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
