
संगमेश्वर- संगमेश्वर ग्रामपंचायत (नावडी) व जि प केंद्र शाळा संगमेश्वर न.2 वतीने साजरी करण्यात आली हा कार्यक्रम रामपेठ शाळेत संपन्न झाला.
कार्यक्रमास सन्माननीय सरपंच सौ प्रज्ञा कोळवणकर उपसरपंच विवेक शेरे सदस्य सौ योगिनी डोंगरे सदस्य गणेश पवार सदस्य सौ.चव्हाण ,सौ.प्रतिक्षा शेरे,ग्रामसेवक, घे भरारी ग्राम संघ अध्यक्ष सौ. प्रिया सावंत, वेदिका मुरकर ,मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा भिडे, शिक्षिका प्राची चोचे रेखा जाधव, पोलीस पाटील अंगराज कोळवणकर, ग्रामपंचायत कर्मचारी अनघा शिवलकर, सौ. निवेंडकर ,अनिल तांबे रामपेठ च्या अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे मदतनीस शीतल अंब्रे. मा. सरपंच सौ. प्रज्ञा कोळवणकर यांच्या शुभहस्ते ध्वज फडकवण्यात आला. व मानवंदना देण्यात आली.राष्ट्रगीत व राज्य गीत विद्यार्थ्यांनी गायले.
यावेळी हात पुढे करून सर्वांनी पंच प्रण शपथ घेतली श्री. प्रमोद दादा शेट्ये यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व शपथपत्राचे वाचन केले.



शिलावरण करून सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. हातावर पणत्या घेऊन सर्वांनी शपथ घेतली.
माजी सैनिक स्वर्गीय हरिभाऊ केशव अंब्रे यांच्या वीर पत्नी श्रीमती शालिनी हरिभाऊ अंब्रे यांचा मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रम अंतर्गत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन माननीय सरपंच प्रज्ञा कोळवणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
श्रीमती शालिनी आंब्रे यांच्या परिवाराच्या वतीने शालिनी अंब्रे यांच्या हस्ते सरपंच यांना आनंद सागर पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन तसेच उपसरपंच यांना पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी देशासाठी बलिदान केलेले वीर योद्धे स्वातंत्र्यसैनिक यांच्या शौर्याबद्दल मोलाचे विचार व्यक्त केले.
शास्त्री नदीकाठी वृक्षारोपण करण्यात आले उपस्थितांचे आभार प्राची चोचे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.