नवी दिल्ली – वंदे भारत एक्सप्रेस भारताच्या रेल्वे नकाशावर झपाट्याने आगेकूच करत आहे. देशातील विविध राज्यांकडून वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत आहे. अनेक राज्यात ही रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांच्या या रेल्वेवर उड्या पडल्या आहेत. सध्या ही रेल्वे १७ मार्गावर धावत आहे. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी ही पहिली वंदे भारत रेल्वे धावली होती. वंदे भारत रेल्वेचा प्रवास अद्भूत आणि आलिशान आहे. वंदे भारत एक्सप्रेस पूर्वी नागपूर ते विलासपूर धावली होती. पण प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने डब्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता नागपूरकरांना पुन्हा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळेल.
आता या मार्गावर धावेल रेल्वे
वंदे भारत एक्सप्रेसचे नागपूरकरांना लवकरच गिफ्ट मिळणार आहे. आता सिंकदराबाद मार्गावर ही रेल्वे धावेल. नागपूर-सिकंदराबाद या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल. ही रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ही रेल्वे धावणार. या रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ खूप वाचला. या दोन शहरात 581 किलोमीटरचे अंतर आहे.
इतके अंतर वाचेल
सिकंदराबाद ते नागपूर या शहरांना जोडण्यासाठी 10 तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे जवळपास 3 तास 30 मिनिटांचा वेळ वाचेल. अवघ्या 6 तासांत नागपूरला अथवा सिंकदराबादला जाता येईल. सध्या भारतात एकूण 17 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आज 11 जून रोजी पटना-रांची वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी झाली. १५ फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी ही पहिली वंदे भारत रेल्वे धावली होती.