‘वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम’

Spread the love

वज्रमुठ सभेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

मुंबई- महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सोमवार, १ मे रोजी मुंबईत पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी आणि इतर नेत्यांनी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे.

कालची वज्रमूठ सभा ही निराश लोकांची सभा असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडी बावचळली आहे. सरकार गेल्यामुळे नैराश्य आल्याची खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हे बोलणारे लोकं आहेत. त्यांनी १ रूपयांत उपचार देण्याची घोषणा केली होती पण आपला दवाखाना नावाची योजना आम्ही सुरू केली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

बारसू रिफायनरीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा उघड झाला आहे. रिफायनरीच्या माध्यमातून ही लोक उघड पडली आहे. रिफायनरीला स्थानिकांचे समर्थन आहे. सध्या बाहेरून लोक आणून आंदोलन सुरू आहे. रिफायनरी बारसूमध्ये करा असं पत्र हेच देतात आणि त्यानंतर तेच विरोध करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

बाबरी मशीद पडत असताना आम्ही त्या ठिकाणी होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते? याच उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला हवे. मुंबईच्या बाहेर तरी पडला होता का? असे खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळसाहेब म्हणणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं हे आश्चर्य असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणुका रोज होत नसतात आणि योग्य वेळी निवडणुका होतील. तेव्हा त्यांची जागा दाखवू, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांचा पाठिंबा आहे. नरेंद्र मोदींवर जितकी टीका करणार तितके लोक त्यांना पराभूत करणार. नरेंद्र मोदी यांना शिविगाळ करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे सध्या खरीप पीक लागवडी संदर्भातल्या बैठकीसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page