दुभंगलेल्या गावांच्या एकीकरणासाठी संघटीतपणाचा संदेश देणाऱ्या गावांना “आता उठवू सारे रान पुरस्कार ” प्रदान

Spread the love

मंडणगड तालुक्यातील जावळे आणि केळेवाडी गावांचा वैचारिक आदर्श;

मंडणगड : गाव संस्कृती जपण्यासाठी वैचारिक आदर्शाचा संदेश देणाऱ्या मंडणगड तालुक्यातील जावळे व केळेवाडी सावरी यांना “आता उठवू सारे रान २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हा सोहळा हाऊसफुल्ल गर्दीत संपन्न झाला. यावेळी सुनील माळी लिखित आणि दिग्दर्शित आगामी नवीन नाटक “बिनविरोध ” याचे लॉंचिंग करण्यात आले.
आता उठवू सारे रान हे सुनील माळी लिखित, दिग्दर्शित नाटक कोकणात तुफान लोकप्रिय झाले आहे. गाव संस्कृती दाखविताना कोकणातील गाव खेड्यांची वास्तव परिस्थितीचे दर्शन घडविताना मानवी जीवनांचे विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. या नाटकात गाव संघटीत झाल्याने होणारे बदल आणि त्यातून अपेक्षित असणारा गरजेचा विकास यावर भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये राजकारण, समाजकारण करताना दुभंगलेली गावची एकी, दुरावलेली नाती यामुळे होणारी गाववासीयांची कुचंबणा दाखविण्यात आली असून शेवटी देण्यात आलेला संदेश मनावर ठसतो आहे. त्याचे फलित म्हणून अनेक गावांनी आपल्या गावातील आपापसातील मतभेद, वाद विवाद मिटवून एकजूट करण्यावर भर दिला आहे.

तालुक्यातील जावळे व केळेवाडी या गावांनीही गावातील गट तट बाजूला करून गाव एकत्रित करून इतर गावांना एक चांगला आदर्श निर्माण करून दिला आहे. त्यामुळे ‘आता उठवू सारे रान ‘ यांच्या संकल्पित उद्देशाने या दोन्ही गावांना प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दोन्ही गावातील प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून आपण घेतलेल्या भूमिकेवर भाष्य करीत आता उठवू सारे रान च्या टीमचे आभार मानले. यावेळी ‘ बिनविरोध ” या नाटकातील एक प्रसंग सादर करण्यात आला. त्याला उपस्थित प्रेक्षकांनी आणि मान्यवरांनी अप्रतिम अशी दाद देत सध्याच्या काळात याची प्रचंड गरज आणि आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच सुनील माळी यांच्या “गाडी चुकली आणि..”., “फ्रेंड्स ” या नाटकातील काही प्रवेश सादर करण्यात आले तेही टाळ्यांची दाद मिळवून गेले. यावेळी आता उठवू सारे रान या नाटकातील कलाकारांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. ज्या गावागावात दुभंगलेली स्थिती आहे त्यांनी असा आदर्श घेवून परिवर्तन करावे, जनजागृती साठी माळींचे ” आता उठवू सारे रान ” आणि ” बिनविरोध ” हे नुसतं फक्त नाटक नसून तो एक विचार आहे, जो आत्मसात करून त्यापद्धतीने गावच्या युवा पिढीने ,ज्येष्ठ गावकरी आणि मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकीकरणाची निर्णायक पावले उचलावी अशी सोहळ्यात उपस्थित सामाजिक आणि राजकीय व्यक्ती यांनी आपल्या आजूबाजूला पाहिलेले अनुभवी आलेले प्रसंग कथन करताना प्रेक्षकांना धमाल हसवून आणि सत्य घटना सांगून स्तब्ध करून सोडले,नाटकात जे दाखवलं आहे ते आपल्याच बाबतीत आहे इतके प्रभावी मांडणी करून लोकांना विचार करायलाच लावणारे नाटक, आज या दोन गावांना पुरस्कार मिळाला, पण पुढे अशी अनेक गावे या पुरस्काराची मानकरी व्हावी ही सदिच्छा श्री मनोजशेठ घागरूम, अनंत फिलसे,महेंद्र टिंगरे, रवींद्र मटकर, प्रदिप मोगरे, मारुती पलंकर ,सुनिल मांडवकर, स्नेहा खापरे,हेमंत रामाणे, विजय घरटकर, सुनील कडू, महेश शिर्के,संतोष रोडत,महेश भानशे, मिलिंद गोठल, संजय मनवे, सचिन जोशी,अरविंद दुर्गवले,अजित गोरुले, बबन खेरटकर, उमेश पोटले, विजय येणेकर, अनंत काप, राजू जाधव,महेश्वर मोरे यांनी केले, जावळे आणि केळे वाडी यांचे अभिनंदन करून झालेल्या परिवर्तन चे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश गोठल यांनी आपल्या गमतीदार शैलीत केले,


नाटकात दाखवलेल्या कोकणातील गाव खेडी वास्तवावर गावागावात दुभंगलेलं ऐक्य साधून परिणामकारक बदल घडून यावा, राजकारण, समाजकारण, साजरे होणारे सण, सार्वजनिक उपक्रम ,कार्यक्रम, उत्सव यातून निर्माण झालेले,गैरसमज आपसात गाव भावकित, नात्या गोत्यात वाढलेले वितुष्ट, या सर्वांला भेदून गावात सामंजस्यपणे ऐक्य साधले जाऊन गावे पुन्हा संघटित व्हावीत, ग्राम संस्कृती चे दर्शन । जपुया गावचे गावपण या भावनेनं हा पुरस्कार संकल्पित केला

  • सुनिल माळी लेखक/ दिग्दर्शक आता उठवू सारे रान

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page