जेरूसलेम- इस्रायल आणि हमासचे युद्ध एका वेगळ्या वळणावर पोहचले आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी मोठी मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत ९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आता इस्रायल आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार करीत आहे. त्यांना प्रशिक्षण देत आहे. इस्रायलच्या पोलिस मंत्री इतामार बेन ग्विर यांनी दक्षिणी इस्रायली शहर अश्कलोनच्या रहिवाशांना शस्रे वाटली आहेत. युद्धाच्या पुढच्या टप्प्यासाठी इस्रायल सज्ज होत आहे. संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी आम्ही एका धोकादायक वळणार आहोत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन लोकांसाठी हा धोकादायक क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी पुढे सांगितले की जसे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल म्हटले होते 6 ऑक्टोबरच्या स्थितीत आता परत जाता येणे शक्य नाही. हमासने इस्रायलवर अमानुष हल्ला करुन पॅलेस्टिनी नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केला आहे. या वादातून आता मार्ग काढावा लागणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. टू स्टेट सोल्युशनच्या आसपास हा वाद सुटला पाहीजे असे त्यांनी म्हटले आहे. इस्रायली आणि पॅलेस्टिनी संघर्षात मोठे यश देखील दृष्टीक्षेपात आले आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की कतारमध्ये हमासच्या साथीदारांवर अमेरिका हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल उत्तरी गाझात प्रवेश करीत आहे. इस्रायलचे सैन्य तीन दिशांनी बिट हनौनच्या दिशेने शिरत आहे. हमासशी होणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एस्क्लोन बंदर आणि तेथील तेल टर्मिनल बंद केले आहे. त्यानंतर इस्रायली सागरी पोलिसांनी इस्रायल आणि गाझा दरम्यानच्या सीमेवर हल्ला केला आहे. जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्री अयमान अल-सफादी यांनी म्हटले की इस्रायलने गाझापट्टी मैदानी लढाई सुरु केली असून त्यामुळे मोठी हानी होणार आहे.