जनशक्तीचा दबाव न्यूज l नवी दिल्ली l सप्टेंबर ०८, २०२३.
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशवासीयांना ट्वीटमार्फत सांगितले की, ‘जोपर्यंत देशातील द्वेश संपत नाही आणि भारत एक होत नाही, तोपर्यंत ह्या भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरुच राहणार आहे. भारत जोडो यात्रेचा हा प्रवास देशाच्या उज्वल भविष्याचा पाया बनत आहे.’ राहुल गांधी यांनी गेल्यावर्षी ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती.
यावेळी गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर हा सुमारे ४००० किमीचा प्रवास पायी केला होता. या काळात गांधींनी २१ जाहीर सभा तर १०० हून अधिक पथ सभांचे आयोजन केले होते. तसेच १३ पत्रकार परिषदाही त्यांनी आयोजित केल्या होत्या. त्यांच्या या भारत जोडो यात्रेत कलाकारांसोबत नेत्यांनीही सहभाग घेतला होता. तसेच माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) दीपक कपूर, माजी नौदल प्रमुख अॅडमिरल (निवृत्त) एल रामदास, अनेक लेखक आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन अनेक मंडळी सहभागी झाली होती.