महायुतीचा मुख्यमंत्री कोण? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले संकेत; म्हणाले, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचं आहे.

Spread the love

सांगली- राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रात पहिली सभा पार पडली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सांगलीत सभा पार पडली. यावेळी अमित शाह यांनी भाषणादरम्यान आगामी मुख्यमंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलचे संकेत दिले. तसेच महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलही त्यांनी जाहीरपणे भाष्य केले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यातच महायुती किंवा महाविकासआघाडी दोघांनीही अद्याप मुख्यमंत्रि‍पदासाठीचा चेहरा जाहीर केलेला नाही. नुकतीच सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण असणार? याबद्दल भाष्य केले आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

प्रत्येक दिवशी आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा आहे, असे अमित शाह यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राला विश्वास आहे. त्यामुळे सांगलीत पुन्हा कमळ फुलणार आहे. आपले मतदान हे सुधीरदादांना नाही, तर भारत देशाला मजबूत आणि समृद्ध बनवण्याचे काम करणार आहे. 2027 पर्यंत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे, असेही अमित शाह म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page