
दबाव वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठाआरक्षण संदर्भात ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे.बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, आमदार बच्चू कडू तसेच वरिष्ठ अधिकारी व सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची ई-उपस्थिती. राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, महसूलचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकासचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, इतर मागासवर्ग विभागाच्या सचिव अंशू सिन्हा , विधी व न्याय सचिव कलोते उपस्थित तर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी.
मराठा आरक्षणासंदर्भात आजवर शासनाने घेतलेल्या निर्णयांची सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली माहिती.
