‘महाविजय २०२४’ अंतर्गत भाजपाकडून राजापूर येथे ज्येष्ठ नागरिकांशी संवाद संपन्न…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | राजापूर | सप्टेंबर ११, २०२३.

आगामी लोकसभा निवडणुका व त्यानंतर होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. थेट मतदारांशी संपर्क करून मतदारांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यासोबतच विविध विकासकामे सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी भाजपा पदाधिकारी सातत्याने जनसंपर्क अभियान राबवत आहेत. २०२४ मध्ये प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून भाजपाचे संपूर्ण बहुमताचे सरकार आणायचेच असा निर्धार करून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्रामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख मा. श्री. प्रमोद जठार, मा. जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, महिला मोर्चा प्रदेश सचिव मा. सौ. शिल्पा मराठे, राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख ऍड. दीपक पटवर्धन, सह-प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, श्री. अभिजित गुरव, श्री. अमित केतकर, श्री. संकेत कदम यांनी आज ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करत मोदीजींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या कल्याणकारी योजना व त्यावरील त्यांचा अभिप्राय घेतला. पुढील काळात मोदी सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा आणि योजना राबवण्याबाबत सूचनांची नोंद यावेळी पदाधिकाऱ्यांनी घेतली.

अशाप्रकारे भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजापूर विधानसभेतील बूथ क्र. २३४ राजापूर वरची पेठ येथील नागरिकांजवळ सरल ऍप, नवमतदार नोंदणी, मेरी माटी मेरा देश अशा विविध विषयांवर केंद्र, राज्य सरकार व भाजपा संघटनेच्या वतीने चर्चा केली. या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. त्याचप्रमाणे राजापुर विधानसभा निवडणूक सह-प्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांनी विविध ठिकाणी उपस्थित राहून सक्रीय सहकार्य केलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page