चिपळूण: चिपळूण शहराच्या राजकीय वर्तुळात स्वातंत्रदिना निमित्ताने उमेश सकपाळ यांनी ढोल वादकाची स्पर्धा आयोजित करून शिवसेना पक्षात प्रवेश करुन अनेकांचे राजकीय ढोल वाजवत खळबळ उडवली. राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश सकपाळ हजारो कार्यकर्त्यां समवेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करताना उमेश सकपाळ म्हणाले आजवर शिवसेनेसाठी जीवाचे रान केले, कसलीही अपेक्षा न करता पंधरा वर्षे झगडत राहिलो. सातत्याने गळचेपी झाली, तरी काम करीत राहिलो. परंतु आता माझ्या सहकाऱ्यांसाठी, तरुणांसाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकारातून काम करायचे आहे, असे सांगत आपण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवसेनेत प्रवेश केला.पालकमंत्री ना.उदयजी सामंत म्हणाले प्रवेशासाठी देशाच्या स्वातंत्र्य निमित्त आणि वाढदिवसाचे मूर्त शोधून शिवसेनेमध्ये उमेश सकपाळ यांनी प्रवेश केला. आज सांगायला अभिमान वाटतो की ढोल गळ्यात न घालता उमेश सकपाळ यांनी अनेकांचे राजकीय ढोल वाजवला.एखादा निर्णय घ्यावयाचा झाला तर विचारपूर्वक निर्णय घेणारा कार्यकर्ता म्हणेज उमेश सकपाळ आहे.उमेश सकपाळ यांनी कोणतेही आमिष न बाळगता शिवसेनेत प्रवेश केला.यापुढे उमेश सकपाळच्या नेतृत्वाखाली चिपळूणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी उपस्थितीत चिपळूण वासियांना दिला.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेनेच्या महिला उपनेते दिपाली ताई सय्यद, रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित,रत्नागिरीचे तालुका प्रमुख बाबू ,सिद्धेश ब्रीद,जमूरत अलजी,पिंट्याशेट पवार,केतन पवार,शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जाहिरात