स्वतःच्या फायद्यासाठी कधीकोणता देश काय करेल याचा नेम नाही. आज युक्रेनवरून रशियावर दबाव टाकण्यासाठी, तसेच रशियाविरोधात उघड भूमिका मांडण्यासाठी भारतावर अमेरिकेसह युरोपीय देश दबाव टाकत आहेत. रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत करत आहेत. आज युक्रेनला याच देशांच्या शस्त्रांची गरज आहे. परंतू याच युक्रेनने एकेकाळी भारताविरोधात पाकिस्तानला रणगाडे, शस्त्रास्त्रे पुरविली होती.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील भारताला रशियाविरोधात भूमिका घेत नसल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. परंतू, त्यांच्याच देशाने पाकिस्तानला टी-८०UD हे रणगाडे दिले होते. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानने १९९१ ते २०२० या काळात युक्रेनसोबत १.६ अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र खरेदी केली होती. यातच ३२० रणगाडे खरेदी देखील होते. हे पाकिस्तानचे मुख्य रणगाडे आहेत. तेच पाकिस्तानने भारताविरोधात युद्धात वापरले होते.
पाकिस्तानला युरोपीय देश आर्थिक मदत करणार आहेत. परंतू त्यासाठी युक्रेनला युद्धात मदत करावी लागणार आहे. यामुळे पाकिस्तान गहू आणि कच्चे तेल रशियाकडून घेऊन रशिय़ाविरोधात लढण्यासाठी ४४ रणगाडे पाठवित आहे. तसेच यापूर्वीही १६२ कंटेनर भरून दारुगोळा पाठविण्यात आला आहे. हा दारुगोळा ब्रिटन आणि अमेरिकन जहाजामधून पाठविला जात आहे.