संगमेश्वर /दिनेश आंब्रे
संगमेश्वर तालुक्यातील माभळे काष्टेवाडी गावातील अभिनय व कळाक्षेत्रात गेले काही वर्षे पदार्पण केलेले अभिनव कलाकर सचिन बाळू काष्टे वडील बाळू गंगाराम काष्टे व आई सुलोचना बाळू काष्टे शेतकरी कुटूंबातील असून सचिन या आपल्या मुलाला त्यांनी गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण दिले. पुढे मंदिराची छोटी -मोठी कामे करत असताना सचिन सचिन हा कटुंब सांभाळत होता.
देवरुख येथील अभिनेते दिगदर्शक प्रभाकर डावल तसेच अभिनेते असित रेडीज त्यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्याच मार्गदर्शनामुळे सचिन यांची अवधूत चिंतन या प्लेटफॉर्म वर निवड झाली हे करत असताना पुढे “स्वामी हो “श्रीपाद राज्यमं शरणं प्रपध्ये , तेजोनिधी या मध्ये वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळाली आहे.
सांस्कृतिक विभाग संगमेश्वर कार्याध्यक्ष म्हणुन निवड झालेली आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद संगमेश्वर चे ते विभागप्रमुख आहेत. रत्नागिरी जिल्हा नमन संघटना सदस्य, लोककला रत्नागिरी कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कळेची प्रामाणिक सेवा करत असताना मार्बल व ग्रेनाईट च्या कामामध्ये डिझायनर म्हणुन त्यांचा हातकंडा आहे. संगमेश्वर पोस्ट गल्ली रोड येथील औदुबंर खालील दत्तमंदिर माभळे जाधववाडी येथील चव्हाटा मंदिर तसेच स्वतःच्या घरामध्ये उत्कृष्ट नक्षीकाम विविध ठिकाणी देवारे तयार केले आहेत. एक व्यक्ती विविध क्षेत्रांमध्ये स्वतःच्या कर्तुत्वाने आणि कलेशी प्रामाणिक राहून जिद्दीने काम करणारा आणि माभळे गावामध्ये अभिनंदननास पात्र ठरणारा आपला सर्वांचा एक आगळा वेगळा अभिनव कोकणी कलाकार सचिन काष्टे.