मुंबई :- शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे ओकारी होती, अशा शब्दांत फडणवीसांनी कडव्या शब्दांत टीका केली. मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. (
फडणवीस म्हणाले, एकेकाळ संताजी-धनाजी यांची अशी दहशत होती की, त्यावेळी मुघलांना जळीस्थळी काष्टी-पाषाणी संताजी-धनाजीच दिसायचे. रात्री मुघल दचकून उठायचे आणि म्हणायचे ‘संताजी-धनाजी आ गया’. आता मोदी-शहांचं नाव घेतलं की हीच अवस्था उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसची झाली आहे.
उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं त्याला भाषण म्हणावं की ओकारी म्हणावं. ती ओकारी होती केवढा मळ निघाला. त्यांची अवस्था म्हणजे मुघलांसारखी झाली आहे. त्यांना समजतच नाही की रोज मोदी-शहांना इतक्या शिव्या दिल्या तरी लोक मोदींच्या मागेच कसे जातात?