मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांनी मातोश्री या ठिकाणी येऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, उद्धव ठाकरे त्यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे तेदेखील वाघच आहेत असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मातोश्रीवर या दोन नेत्यांची भेट झाली. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरेंना न्याय देईल अशी अपेक्षा आहे असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते
मागील काही दिवसांत जो घटनाक्रम घडला आहे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली आहे, त्यांचया पक्षाचं चिन्ह चोरीला गेलं, त्यांच्या पक्षाचं नाव चोरीला गेलं, त्यांचं जे काही होतं, ते सगळं चोरी करून नेलं, पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र यांच्याबरोबर आहे हा मला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून यांना संपूर्ण न्याय मिळेल अशी आशा मला आहे. येत्या प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भरगोस यश मिळेल, असं मला वाटतंय असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
जाहिरात :