भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार:स्वत:ला बाळासाहेबांचे वारस सांगणारे उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते; अमित शहांची सडकून टीका…

Spread the love

पुणे प्रतिनिधी- विरोधक आमच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, पण भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार हे शरद पवार आहेत, त्यांनीच भ्रष्ट्राचाराला संस्थात्मक करण्याचे काम केले, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

ते पुण्यात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल चढवला. फेक नरेटिव्ह करून विरोधकांनी थोडा बहुत विजय मिळवला, पण आता विधानसभेत त्यांचा खोटारडापणा बाहेर पडेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

भाजप नेतृत्वातच महायुतीचे सरकार बनेल…

अमित शहा पुढे बोलताना म्हणाले की, या बैठकीतील माझे शब्द लक्षात ठेवून घरी जा. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचंड बहुमतामध्ये महायुतीचे सरकार बनेल. अन् हे सरकार भाजपच्याच नेतृत्वाखाली बनेल, असा दावा त्यांनी केला. 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पराभवानंतरही राहुल गांधी यांच्यात अहंकार…

2014 ते 2024 या काळातील तीन निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केले आहे. परंतु काही लोकांना अपयश आले तरी देखील राहुल गांधी यांच्यात अहंकार आला आहे. जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारीपणाने वावरत आहेत.

औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे…

स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत, असा हल्लाबोल शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. अमित शहा यांनी केला. कॉंग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. परंतु यांनी 60 वर्षांमध्ये गरीबांच्या कल्याणासाठी काय काम केले. हे काहीही करू शकत नाही. आरक्षणाचा अपप्रचार केला. संविधान हटावचा अपप्रचार केला, पण आता त्यांचा प्रचार आता चालणार नाही. लोकांना त्यांचा खोटा अपप्रचार समजला आहे, असेही शहा म्हणाले.

शरद पवारांची सत्ता आली की मराठा आरक्षण गायब…

जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे; तर जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार आले तेव्हा मराठा आरक्षण गायब झाले. आता पुन्हा देखील मराठा आरक्षण महायुतीच्या सरकारने दिले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम हे भाजपनेच केले आहे.

लोकसभेत कार्यकर्त्यांची मेहनत पाहिली…

पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी भाजप कार्यकर्त्यांची मेहनत बघितली. याच कार्यकर्त्यांमुळे आपल्याला यश मिळाले. 60 वर्षानंतर पहिल्यांदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. विधानसभा निवडणुकीत आपला मोठा विजय मिळवायचा आहे.

काल रात्री देखील मला कार्यकर्ते भेटले. संभ्रम निर्माण करण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. राम जनमभूमीसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केलाय. कुणीही इतकी वर्ष तिथे पाहिले नाही. आम्ही मंदिर बनवून दाखवलं. उत्तराखंडमध्ये आम्ही समान नागरी कायदा आणला आता संपूर्ण देश वाट बघतोय. आम्ही आतकवाद संपवून टाकला.

दूध पावडर आयातीचा निर्णय पवारांचाच…

आम्ही एक ग्रॅम देखील दूधाची पावडर गेल्या दहा वर्षात आयात केलेली नाही आणि करणार देखील नाही. परंतु दूध पावडर आयातीचा निर्णय हा शरद पवारांचा आहे. त्यांनीच हा अद्यादेश त्यांच्या कार्यकाळात काढलेला आहे. खोटा प्रचार करुन लोकांची दिशाभूल करण्याचे काम शरद पवारांसह विरोधकांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांप्रती, गोरगरीबांप्रती भाजप सरकार बांधिल आहे, असेही अमित शहा म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page