माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंनी घेतली मनोहर जोशींची भेट

Spread the love

मुंबई- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने काल रात्री उशीरा त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.सध्या त्याच्यावर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांमार्फत देण्यात आली आहे.नुकतीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी हिंदुजा रूग्णालयात जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचं व्यक्तीमत्व म्हणून मनोहर जोशींकडे पाहिलं जातं. मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीयांपैकी एक आहेत.त्यांना जोशी सर म्हणूनही ओळखलं जायचं. मनोहर जोशी यांचं वय ८६ वर्षांचं आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचं सरकार जेव्हा १९९५ मध्ये आलं तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीही झाले होते.आजवर त्यांनी महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषवलं आहे.त्यानंतर मधल्या काळात ते सक्रिय राजकारणापासून खूप दूर होते.

दरम्यान काल मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर आहे असं समजतं आहे. मात्र, हिंदुजा रुग्णालयाकडून लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page