संगमेश्वर /श्रीकृष्ण खातू – संगमेश्वर येथील उदय संसारे यांनी वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी ग्राम सेवक व ग्राम विस्तार अधिकारी पदावरून चाळीस वर्षे सेवा करून आता चांगल्या आरोग्याने वयाची सत्तरी पूर्ण केली. व आतापर्यंत आपण सुखाने आयुष्य जगलो,त्यासाठी समाजाचे व निसर्गाचे आपण देणं लागतो,या कृतज्ञेतून व भावनेतून निसर्गासाठी व समाजासाठी आताच्या वयाएवढी म्हणजे सत्तर वृक्ष जाखमाता मंदीर परिसरात,नवनिर्माण काॅलेज आवार ,टोलभैरव मंदिर आवार,या ठिकाणी नारळ,सुपारी, गुलाब, जास्वंद इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली .उर्वररीत झाडे शेतकरी,कारागिर, घरेलू कामगार,मित्र परिवार,हितचिंतक इत्यादींना वाटप करून कृतज्ञता व्यक्त करून वृक्षांमुळे हवा,सावली,पाऊस,पर्यावरण व निसर्ग यांचा समतोल राखून मानवी जीवनाला अशा गोष्टींचा फार चांगला फायदा होतो,अशा एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आदर्श उदय स़सारे यांनी घालून दिला.
याच बरोबर कसबा सुतार वाडी ब्रीज ते टोलभैरव मंदिर ते स्मशान भूमी संतक्षण भिंत पाकाडीसह बांधून मिळावी यासाठी आमदार शेखरजी निकम यांच्याकडे मागणी प्रस्ताव ही वाढ दिनी देऊन त्या कामाचा पाठपुरावा उदय संसारे करणार आहेत असे ते म्हणाले.
याप्रसंगी वृक्षलागवड विविध ठिकाणी नवनिर्माण काॅलेज प्राचार्या संजना चव्हाण, प्रा.कदम , प्रा.भोसले,व्यापारी दिलीप रहावे,संदेश कापडी,बापू भिंगार्डे,दादा कोळवणकर, बी,डी,साळवी,जनार्दन शिरगावकर, मुल्ला,देव पुजारी गुरव बंधू तसेच अपर्णा संसारे,सरपंच प्रज्ञा कोळवणकर, संज्ञा कोळवणकर, मित्र परिवार, इत्यादींनी उपस्थित राहून उदय संसारे यांच्या या उपक्रमाचं कौतुक करून वाढ दिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.