संगमेश्वर ,प्रतिनिधी-
▪️”झिम्मा फुगडीमुळे शरीराचा उत्तम व्यायाम होतो आणि शरीराचे उत्तम रक्षण होवू शकते यासाठी व महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीच ही स्पर्धा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरी रायगड जिल्हयाचे पालकमंत्री नामदार उदय सामंत फाऊडेशन यांनी ही स्पर्धा सुरु केली तसेच सामाजिक , आरोग्य, सांस्कृतिक, क्षेत्रात तळागाळातील माझ्या बंधू भगिनींचा सहभाग या मध्ये होवून एकोपा वाढवा हेच या कार्यक्रमाचे उदिष्ट” असे उद्गगार महिला तालुकाप्रमुख सौ कांचनताई नागवेकर यांनी उद्घाटन प्रसंगी काढले
▪️या उद्घघाटन प्रसंगी व्यासपिठावर श्रीमती स्मिता भिवंदे मॅडम सौ प्रज्ञा शिवगण, (महिला विभाग प्रमुख)उपसरपंच सौ अजनबी दर्वेश, श्री सुनिल नावले,(उपतालुकाप्रमुख) विभागप्रमुख श्री विजयजी चव्हाण,श्री अजय तेंडुलकर,(विभाग संघटक)श्री सागर नार्वेकर (शाखाप्रमुख ) गोळप ग्रामपंचायत सदस्य श्री वारीशे, श्री दामोदर लोकरे, भजन सम्राट भगवानबुवा लोकरे, श्रीमती सरोज हरचकर सौ रिध्दी आडविरकर, श्री राजाराम नाटेकर,श्री सुभाष तारये साहेब आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली पूर्णगड किनारपट्टीवर विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात विराट जनमुदाय समवेत रंगलेल्या या झिम्मा फुगडी स्पर्धेच्या कार्यक्रमात श्रीराम महिला डोर्लेकरवाडी गावडेआंबेरेने प्रथम क्रमांक फटकवला तर दृतीय क्रमांक हनुमान महिला मंडळ ग्रुप हनुमानवाडी गावडे आंबेरे तृतीय क्रमाक समर्थ ग्रुप नाखरे उत्तेजनार्थ श्री महापुरुष महिला मंडळ नवानगरवाडी,मच्छगंधा महिला मंडळ लोकरेवाडी, शिवशक्ती ग्रुप शिवगणवाडी गांवखडी यांनी फटकावले यावेळी भावकी बंधू महिला मंडळ पूर्णगड या मंडळाने बाई पण भारी देवा हा कार्यक्रम सादर करुन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रम बक्षिस समारंभ प्रस़गी सौ भावना लोकरे,सौ प्रिया लोकरे परिक्षक सौ शितुत मॅडम सौ चांदोरकर मॅडम श्रीमती स्मिता भिंवंदे आदी मान्यवर उपस्थित होते
▪️सर्वाचे आभार सरोज हरचकर यांनी मानले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री प्रयाग शिरगांवकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव श्री बबन आडविरकर, श्री प्रल्हाद हरचकर, श्री रविद्र डोर्लेकर, श्री आशिष हरचकर, श्री जयवंत डोर्लेकर व परिवर्तमंच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली.