
कर्तव्यदक्ष व कडक शिस्तीचे पोलीस अधिकारी म्हणून उदय झावरे यांची ओळख
उदय झावरे यांची देवरूखात बदली झाल्याने अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा?
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी उदय झावरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कडक शिस्तीचे असणारे उदय झावरे यांची देवरूख येथे बदली झाल्याने अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आला असल्याची चर्चा आहे.
उदय झावरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आहेत. सध्या ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे कार्यरत होते. कर्तव्यदक्ष व कडक शिस्तप्रिय ओळख असलेले उदय झावरे यांची देवरुख पोलीस ठाणे येथे बदली झाली असून त्यांनी आपल्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. अत्यंत कडक व शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. संगमेश्वरमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. यावेळी त्यांची कडक व शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख निर्माण झाली होती. त्यांनी आपल्या कामातून आपल्या नावाचा दरारा निर्माण केला होता.
ते यापूर्वी संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. कोरोनाच्या काळात उत्तम काम करून संगमेश्वरवासियांना त्यांनी सहकार्य केले होते. तसेच सामाजिक व लोकाभिमुख उपक्रम त्यांनी राबवले होते. आजपर्यंतची पोलीस खात्यातील उल्लेखनीय अशी त्यांची कामगिरी राहिली आहे. यानंतर त्यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली होती. याठिकाणी त्यांनी चांगली कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांची अलिबाग येथे बदली झाली होती. आता त्यांची देवरूख येथे बदली झाली आहे. यावेळी बोलताना सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून काम करणार असून देवरूखसह परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.