
*संगमेश्वर प्रतिनिधी-* संगमेश्वर येथे पारेख पेट्रोल पंपा समोर राष्ट्रीय माहार्गावर दोन वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातात दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताचा संगमेश्वर पोलीस तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी दाखल होऊन दोन्ही वाहने बसजूला करून तासभर खोलंबलेली वाहतूक सुरळीत केली केली.
संगमेश्वर एसटी स्टॅन्ड पासून काही अंतरावर असलेल्या मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पारेख पेट्रोल पंपा समोर गोव्याच्या दिशेने जाणारा GA.04.T.5287 आयशर टेम्पो आणि मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या HR55A/U 1837 टाटा ट्रक चा अपघाता झाला. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नसून दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास अपघाताची घटना घडली.

महामार्गाच्या सुरु असलेल्या कामा मुळे महामार्गावर गेले काही दिवस वाहतूक कोंडी समस्या ऐरणीवर आली आहे. उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात आलेला चाकरमानी मुबंई च्या दिशेने परतीच्या मार्गावर निघाल्याने माहामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून आंबेड बुद्रुक ते शास्त्रीपुल पर्यंत वाहतूक कोंडी समस्या चांगलीच भेडसावत असून पंधरा मिनिटाचे असलेले अंतर कापण्यासाठी तास ते दोन तास लागत असून वाहतूक कोंडी सोडवताना संगमेश्वर तसेच महामार्ग पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.तरी प्रवासी जनतासुद्धा कमालीची मेटाकुटीस येत आहे.
रोजची वाहतूक कोंडी समस्येत आज भर पडली ती आज महामार्गावर दोन वाहनात झालेल्या वाहाना मुळे मुबंई तसेच गोवा च्या दिशेने वाहतूक कोंडी मुळे संथगतीने चालणाऱ्या वाहनांना ब्रेक लावावा लागल्याने दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मात्र अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनय मनवळ, राष्ट्रीय महामार्ग चे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय उकर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रियाज मुजावर यांनी अपघास्थळी पोहचून अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून खोलंबलेल्या वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला.
संगमेश्वर तसेच महामार्ग पोलिसांनी तत्परतेने अपघातातस्थळी येऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्याचे कर्तव्य केल्यामुळेच वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने वाहतूक कोंडीतून सुटका झालेल्या काही प्रवाशी व वाहन चालकांनी पोलिसांचे अक्षरशः आभार मानले.