मालवण शहरातील बोर्डिंग ग्राउंडनजीक असलेल्या शिलाई मशीन दुरूस्ती व लेडीज टेलर या दोन दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. यात १२ ते १३ शिलाई मशीन व ग्राहकांचे कपडे फॅन व इतर साहित्य जळून खाक झाले.यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
मालवण बोर्डिंग ग्राउंड नजीक विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरूस्तीचे तर मेढा येथील मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलरचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी ५ वाजण्याच्या दुकानातून अचानक आगीचे लोळ येत असताना धुरीवाडा येथील भाई खोबरेकर यांच्या निदर्शनास आले त्यानंतर अग्निशामक दलाला कळविण्यात आले