खेड मुंबई – गोवा महामार्गारील अपघात दोघे जण जखमी

Spread the love

खेड :- मुंबई – गोवा महामार्गावर शुक्रवार दि . १ रोजी दुपारी १२.३० वाजता भरणे काशिमठ गोवळवाडी येथे दुचाकी व जीतो टेम्पोची धडक झाली . या अपघाता दोन जण जखमी झाले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई – गोवा महामार्गावर शुक्रवार दि . १ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी ( एमएच ०८ एबी २१२० ) दुभाजक पार करत असताना महिंद्रा जीतो मोटार ( एमएच ०८ डब्ल्यू ४८९१ ) सोबत दुचाकीची धडक झाली . या अपघातात ॲक्टिव्हा चालक व मागे बसलेला स्वार अरफात असलम कादिर ( वय २० , रा . नांदगाव खेड ) व आजर अब्बास शेख ( वय १६ , रा . नांदगाव खेड ) हे जखमी झाले . त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page