ठाणे : निलेश घाग भिवंडी येथील खाऊच्या दुकानात खाऊ घेण्यासाठी गेलेल्या दोन लहान चिमूरडी मुले हरवल्याची घटना बुधवारी न्यू आझाद नगर गायत्री नगर परिसरात घडली होती. याबाबत मुलांच्या पालकांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल करताच शांतीनगर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या दोन तासात मुलांचा शोध घेत पालकांच्या स्वाधीन केले आहे.
ठाणे शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके मुलांच्या शोधासाठी रवाना केली होती.
सापडलेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघेही लहान मुले न्यू आझाद नगर गायत्री नगर परिसरात खाऊच्या दुकानातून खाऊ घेण्यासाठी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेली होती. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मुलांचा शोध परिसरात घेऊनही ही दोन्ही मुले सापडली नसल्याने अखेर मुलांच्या पालकांनी सायंकाळी पाच वाजता शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखता शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके मुलांच्या शोधासाठी पाठवली होती.
बीट मार्शल एकचे बीट अंमलदार पोलीस हवालदार गावडे व पोलीस नाईक नवसारे यांना दोन्ही हरवलेली मुले चावींद्रा डम्पिंग ग्राउंड येथे मिळून आली. या दोन्ही मुलांना शांतीनगर पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुखरूप स्वाधीन केले असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा दिली आहे.
जाहिरात