संगमेश्वर :कोंडिवरे येथे पावसामुळे दोन घरे कोसळून नुकसान

Spread the love

संगमेश्वर :- चार दिवसांत कोंडिवरे येथे पावसामुळे दोन घरे कोसळून नुकसान झाले आहे .
माखजन परिसरात गेले ८ दिवस दमदार पाऊस कोसळत आहे . चार दिवसांपूर्वी कोंडिवरे , ता . संगमेश्वर येथील मिलिंद कदम यांच्या घरावर झाड कोसळल्याने घरावरील पत्रे तुटून नुकसान झाले होते . काल शनिवारी रात्री रामचंद्र भिकाजी सावंत यांचे घर कोसळल्याने घराचे छप्पर तुटले व नुकसान झाले आहे . दोघांचे मिळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे . या झालेल्या नुकसानीचा पंचनामा तलाठी गुरुसिंगे यांनी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page