राजापूर / प्रतिनिधी – राजापूर तालुक्यातील खरवते येथील प्रगतीशिल शेतकरी दयानंद बाबाजी चौगुले यांच्या मुंडगा व सर्वट या गावठी भात बियाण्याना भारत सरकारच्या कृषी विभाग व डॉ . सावंत कोकण कृषी विद्यापिठ यांच्याकडुन पेटंट प्रमाणपत्र देण्यात आले आहे .
खरवते गावचे प्रगतिशील शेतकरी दयानंद चौगुले यांच्या गावठी भात बियाणे मुंडगा व सर्वट या भात बियाण्यांची भारत सरकार कृषी विभाग यांनी दखल घेतली असुन भारत सरकारच्या कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्याकडून त्याना सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ रोजी कोकण कृषी विद्यापिठ दापोलीचे कुलगुरु डॉ . भावे यांच्या हस्ते पेटंट प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले .
मुंबइ गोवा महामार्गावर असणाऱ्या राजापूर तालुक्यातील खरवते या छोट्याशा गावातील दयानंद बाबाजी चौगुले यांना यापूर्वी कृषी विभाग राजापूर यांच्याकडून सलग 3 वर्षे प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले होते तर कृषी विभाग रत्नागिरी यांच्याकडून आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले होते. दयानंद चौगुले हे गेली अनेक वर्षे सातत्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असुन राज्यातील विविध सामाजिक संस्थांकडूनही त्याना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे .
आता त्यांच्या दोन गावठी भात बियाण्यांची भारत सरकारच्या कृषी विभागाने दखल घेतली असुन त्यांच्या मुंडगा व सर्वट या भातबियान्याना पेटंट प्रमाणपत्र दिले आहे . त्यामुळे त्यांचे समाजाच्या विविध स्तरांतुन कौतुक करण्यात येत आहे.