
▪️११ लाखाच्या दारूसह ३१ लाखाचा मुद्देमाल जप्त.– बांदा पोलिसांची कारवाई.
♦️बांदा/प्रतिनिधी,ता.०२: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी गुजरात येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अकरा लाखाच्या दारू सह तब्बल ३१ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बांधा तपासणी नाक्यावर करण्यात आली प्रदीप कुमार श्री भगवती प्रसाद मोहम्मद वहिनी वहिनी राजकोट गुजरात अशी त्यांची नावे आहेत त्यांच्या कडून असलेला ट्रक रद्द करण्यात आला
♦️याबाबतची तक्रार बांदा पोलिस हवालदार प्रसाद पाटील यांनी दिली आहे त्यानुसार त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक माहिती अशी की सावंतवाडीकडे बेकायदेशीर दारू मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार बांदा पोलिसांनी येथील असणे नाक्यावर सापळा गाडी अडवली त्यावेळी या गाडीत अकरा लाख रुपयाच्या दारूसह वीस लाखाचा ट्रक जप्त करण्यात आला