अमली पदार्थांची तस्करी करणारे दोघे जाळ्यात; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई…

Spread the love

पुणे : पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने वानवडी परिसरात कारवाई करून तब्बल ११ लाखांचा अमली पदार्थ पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एमडी, एलसीडी, मशरूम तसेच चरस असा वेगवेगळा अमली पदार्थ पकडला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

लायनल लेझली मेस्करेंस (वय ३३) व रसल ऍंथोनी चंदनशिव (वय २१, रा. वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अमली पदार्थ तस्कारांचा राबता वाढल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. या अमली पदार्थ तस्कारांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. यादरम्यान, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे वानवडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकाला दोघे संशयित अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी एका बँकेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने याठिकाणी सापळा रचला.

तसेच, दोघे संशयित दिसताच त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता लायनल याच्याकडे एमडी, एलसीडी, मशरूम, चरस, हाशिस ऑईल तसेच रसल याच्याकडे एलसीडी पेपर, ओजीकोश गांजा आणि इतर ऐवज मिळाला. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ११ लाख ९३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांनी हा अमली पदार्थ कोणाकडून आणला तसेच त्याची विक्री ते पुण्यात कोणाला करणार होते, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page