
रत्नागिरी- चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाडीला सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर बावनदी येथे ही घटना घडली आहे. या अपघातात ट्रॅव्हल्स सुमारे २० फूट खोल दरीत कोसळली असून, अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला अपघात…
सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बावनदी परिसरात ही दुर्घटना घडली. चिपळूणहून रत्नागिरीकडे निघालेली मिनी बस (वडाप) निवळी गावाजवळ असताना, मागून भरधाव वेगात आलेल्या गॅस टँकरने बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बस थेट दरीत कोसळली. धडकेनंतर टँकरमधून गॅसची गळती होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच जखमींची अचूक संख्या अजून कळू शकलेली नाही. घटनास्थळी प्रशासनाची टीम उपस्थित असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

अग्निशमन दल पोलीस व प्रशासनान त्वरित घटनास्थळी दाखल…
सीएनजी टँकर व चिपळूण येथून निघालेले ट्रॅव्हल्स बस यांच्या धडकेने मोठा आवाज झाला व सीएनजी टॅंकर जवळ असलेल्या एका गुरांच्या गोठ्यावर घरावर कोसळला या दुर्घटनेत सुदैवाने घरातील सात ते आठ माणसं मोठा आवाज झाल्याने बाहेर पळाली त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत. मात्र या दुर्घटनेत गुरांचा गोठा जळून खाक झाला आहे. या यामध्ये दोन गुर जखमी झाली आहेत यामध्ये दुभत्या जनावरांचा समावेश आहे. घराजवळ उभी असलेली रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे व घरावरील फायबरचे पत्रे पेटले आहेत. या मोठ्या अपघातात 20 ते 25 व्यक्ती जखमी असून त्यांना तातडीने रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा, महसूल, अग्निशमन दल आधी शासकीय सुरक्षा यंत्रणा दाखल आहेत. सीएनजी टँकर मधून होणारी गळती थांबवण्यात यश आलं आहे.



चिपळूण वरून रत्नागिरी ला जाणारे 25 ते 26 प्रशिक्षणार्थी शिक्षक जखमी…
निवळी घाटात रविवारी सकाळी सुमारास एक भीषण अपघात घडला. चिपळूण येथून रत्नागिरीकडे शिक्षक प्रशिक्षणासाठी निघालेल्या खासगी मिनी बसला (ट्रॅव्हल्स) भरधाव वेगाने आलेल्या सीएनजी गॅस टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात सुमारे २५ ते २६ शिक्षक जखमी झाले आहेत.
अपघाताची ही घटना बावनदी परिसरात घडली. धडकेनंतर मिनी बस थेट सुमारे २ फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की मिनी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून अनेक शिक्षक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

टँकर मधून गॅसची गळती नागरिक भयभीत…
या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती होऊ लागली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल, महसूल विभाग आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून सर्व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

टँकर घरावर कोसळल्याने गाईचा गोठा व रिक्षा जळून खाक…
या दुर्घटनेत घटनास्थळी टँकर शेजारच्या एका घरावर आणि गुरांच्या गोठ्यावर कोसळला. त्यामुळे गोठा आणि घराचे फायबर पत्रे जळून खाक झाले असून दोन दुभत्या गायी जखमी झाल्या आहेत. घराजवळ उभी असलेली एक रिक्षाही पूर्णपणे जळून गेली आहे. मात्र मोठा आवाज ऐकून घरातील ७-८ व्यक्तींनी तत्काळ घराबाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली.

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सीएनजी टँकरमधील गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

25 ते 26 शिक्षक जखमी…
या अपघातामध्ये देवरुख व संगमेश्वर परिसरातील 25 ते 26 शिक्षक जखमी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत . संकेत कृष्णकांत जागुष्टे,विराज राजाराम सावंत, मंदा सुखदेव खाडे, स्मिता मधुकर पाटील, उषा अमोल खाडे, जयश्री सूर्यकांत गावडे, प्रियंका दिलीप जाधव, नेहा संतोष मिस्त्री, धर्मेंद्र दत्तात्रय देरुगडे, दिलीप न्यानेश्वर डोंगरे, सुलक्षणा संभाजी पाटील, निशिकांत दिनानाथ वानरकर, रूपाली सूर्यकांत यादव, श्वेता संजय चव्हाण, हर्षली हेमंत पाकळे ,नीता विनायक बांद्रे ,मीना सुभाष घाडगे ,सोनाली हरेश सावंत ,कमल किशोर किसन महाडिक, प्रेम कुमार बबन शिवगण,अमोल गणेश कोतवाल, मनीषा संतोष कांबळी, मालिनी दीपक चव्हाण, श्वेता संजय चव्हाण, प्रियंका जाधव, रुपेश यादव, अशी जखमी झालेल्या सगळ्या शिक्षकांची नाव आहेत हे सगळे शिक्षक देवरुख संगमेश्वर परिसरातील आहेत.