आरोग्य : केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक प्रोडक्टस चा वापर करतो, यांच्या परिणामांमुळेमुळे देखील कोंडा होऊ शकतो.
जर आपल्याला या समस्यां मुळापासून नष्ट करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय करून पहा…
1. लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. ३ ते ४ लिंबू घ्या व त्यांची साले काढून त्यांना जवळ जवळ अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनटासाठी उकळवा व नंतर पाणी थंड झाल्यावर हा पाणी आठवड्यातून २ वेळा आपल्या केसां मध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.
2. कडुलिंब ची पाने बारीक वाटून घेवून त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा.
3. तुळशीची पाने व आवळ्याची पावडर पाण्यामध्ये मिळवा आणि याचा लेप बनवा आणि या लेपाने आपल्या केसांची मालिश करा. अर्ध्या तासासाठी असेच ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या.
4. खोबरेल तेलही कोंड्यावर फारच गुणकारी आहे. दोन ते तीन वेळा खोबरेल तेलाने मसाज करा.
जाहिरात :