
रत्नागिरी:- तालुक्यातील ओरी येथील रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघजण जखमी झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता.२२) सायंकाळी सातच्या निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावरिल ओरी गावातील एका हॉटेलच्या पुढे २०० मिटर अंतरावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकुश छोटू पाटकर हे दुचाकी (क्र. एमएच-१० टी ८०८७) वरुन सोबत संदेश धोंडू घाणेकर (दोघेही रा. आगवे घाणेकरवाडी, रत्नागिरी) याला घेऊन ओरी ते आगवे जात होता. तेथील एका हॉटेलच्या समोर २०० मिटर अंतरावर समोरुन येणारा अवजड ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरिल दोघेही जखमी झाले. संशयित अज्ञात ट्रक चालकाने अपघात करुन न थांबता पलायन केले. या प्रकरणी महेश मनोहर गोताड (वय ३३, रा. खालगांव मधली गोताडवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर