मुंबई – गोवा महामार्गावरील बहुचर्चित अशा कशेडी बोगद्यातून वाहतूक अखेर बंद

Spread the love

मुंबई – गोवा महामार्गावरील बहुचर्चित अशा कशेडी बोगद्यातून वाहतूक अखेर बंद

खेड :- मुंबई – गोवा महामार्गावरील बहुचर्चित अशा कशेडी बोगद्यातून वाहतूक अखेर बंद करण्यात आली आहे . सोमवारी रात्रीपासून या बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे . गेले २२ दिवस या बोगद्यातून कोकणात येणाऱ्यांसाठी एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती .
गणेशोत्सवाच्या कालावधीसाठी महामार्गावर होणारी वर्दळ लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात या बोगद्यातून वाहतूक सुरु केली गेली होती . कशेडी बोगद्यातून प्रवास करणे मोठ्या उत्साहाचा विषय ठरला होता . मुंबई – गोवा महामार्गावरील हा मोठा बोगदा आहे . तब्बल २२ दिवसानंतर आता या कशेडी बोगद्यातून कोकणात येणाऱ्यांसाठी एकेरी सुरु करण्यात आलेली वाहतूक सोमवारी रात्रीपासून बंद करण्यात आली आहे , अशी माहिती महामार्ग बांधकाम विभागाने दिली आहे . कशेडी बोगद्याचे काम अजून अपूर्ण आहे . हे काम जलदगतीने पुन्हा हाती घेण्यात येणार असल्याचेदेखील सांगण्यात आले .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page