जयगड-खंडाळा मार्गावर ट्रक-बोलेरोचा अपघात; एका वाहनाचे मोठे नुकसान….

Spread the love

रत्नागिरी | 15 सप्टेंबर 2025- जयगड-खंडाळा मार्गावर नांदिवडे कमानीजवळ काल रात्री एका मालवाहू ट्रकने समोरून येणाऱ्या बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हा अपघात शुक्रवारी, १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास नांदिवडे कमानीसमोर घडला. फिर्यादी श्रीकृष्ण अनंत बिवलकर (वय ३४, रा. नांदिवडे) हे त्यांच्या महिंद्रा बोलेरो निओ एन८ (MH08/AAX/5609) या गाडीतून जयगड पोलीस चेकपोस्टकडून नांदिवडेकडे जात होते. नांदिवडे कमानीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगमधून ते मुख्य रस्ता ओलांडून पुढे जात असताना, जयगडहून खंडाळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका १४ चाकी ट्रकने (KA02/C/6640) त्यांच्या गाडीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.

या अपघातामुळे बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, तर आरोपी ट्रक चालक सुनील श्रीकांत वाटमकर (वय २५, रा. कर्नाटक) याने निष्काळजीपणे गाडी चालवून हा अपघात घडवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी श्रीकृष्ण बिवलकर यांच्या तक्रारीवरून जयगड पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page