दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गणपतीपुळ्याला पसंती..

Spread the love

श्री गणपती च्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा….

गणपतीपुळे- गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांनी भरपूर गर्दी केली आहे . तीन ते चार‌ दिवसापासून गणपतीपुळे येथे पर्यटकांची दर्शनासाठी गर्दी होत असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

गणपतीपुळे आणि परिसरात स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन झाल्यानंतर पर्यटक समुद्र किनारी फिरण्यासाठी येत असतात मात्र समुद्रकिनारी आल्यानंतर पर्यटकांना भक्तांना समुद्र स्थानाचा मोह आवरत नसल्याने पर्यटक समुद्रामध्ये आंघोळीसाठी उतरत असतात.

यावेळी समुद्राच्या पाण्यात बुडून कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक तसेच गणपतीपुळे पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी दिवसभर समुद्रकिनारी गस्त घालताना दिसून येत आहेत. मात्र आलेल्या पर्यटकांमधून काही‌ ‘हौसे नवसे’ या पोलीस कर्मचारी व जीव रक्षक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत समुद्राच्या खोलवर जात असतात.

मात्र गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व पोलीस कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत भक्त पर्यटकांना वेळीच बाहेर काढत पुढचा अनर्थ टाळतात. मात्र पर्यटक ब-याचवेळा ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने एखाद्या वेळेस एखाद्या पर्यटक पाणी पिऊन समुद्रात अडकतो.

गणपतीपुळे येथे होणारी गर्दी पाहता येथील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळ्याच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, पोलीस नाईक जयेश कीर, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण,तसेच होमगार्ड गर्दीवर नियंत्रण करत आहेत.

गणपतीपुळे आणि परिसरात दिवाळी च्या सुट्टीमुळे मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकंदरीतच सर्वच व्यवसायिक खुश असल्याचे दिसून येत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page