सिंधुदुर्ग : सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील पर्यटक रत्नागिरी , सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.गणपतीपुळे,मांडवी,भाट्ये ,आरे- वारे ,मालवण-दांडी किनारी पर्यटकांच्या गर्दीचे जथ्थे पहावयास मिळत आहेत. पर्यटक किनार्यावर स्कुबा डायव्हिंग, स्नॉकर्लिंग यासारख्या साहसी क्रीडा प्रकाराचा बिनदिक्कत आनंद लुटत असताना शासकीय यंत्रणा मात्र सुशेगात आहे. याठिकाणी सागरीसुरक्षा रक्षक नाही किंवा पोलिस बंदोबस्त नसल्याने पर्यटकांची सुरक्षितता रामभरोसेच असल्याचे चित्र आहे.