
उत्तराखंडमध्ये आभाळ फाटलं आहे. अचानक पाण्याचा प्रचंड लोंढा आला. त्यात डोंगरातील माती, मलबा वाहून आला. हा थरार व्हिडिओत कैद झाला. यावेळी स्थानिकांच्या किंकाळ्यांना आसमंत व्यापून गेला. काय घडलं तिथं?
उत्तराखंड- उत्तराखंडातील उत्तरकाशीत आभाळ फाटलं. गंगोत्री आणि मुखवा जवळील धराली गावाजवळ ढगफुटी झाली. त्यामुळे गावाला लागून असलेल्या नदीतून पाण्याचा प्रचंड लोंढा मातीच्या मलब्यासह गावात घुसला. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. त्यावेळी गावकऱ्यांच्या किंकाळ्यांनी एकच गोंधळ उडालेला दिसतो. 20 सेंकदात या गावात सगळं कसं उद्धवस्त झालं. 12 लोक मलब्या खाली गाडल्या गेल्याची भीती आहे. तर 60 जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेने गावकरी घाबरले. गेल्या काही वर्षांत ढगफुटी आणि जमीन खसण्याचे प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे अनेक जणांना प्राण गमवावा लागला आहे.
गंगोत्री धामजवळ भीतीचे वातावरण…
ढगफुटीमुळे येथील छोट्या नदीत पुराची लाट आली. माती, मलबा मोठ्या प्रमाणात गावात येऊन धडकला. किनाऱ्यावरील घरांना त्याची धडक बसली. अवघ्या 20 सेकंदात सगळ काही उद्धवस्त झाल्याचे दिसून येते. हाती आलेल्या माहितीनुसार, 60 लोक बेपत्ता झालेला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने या नैसर्गिक संकटाची पुष्टी केली आहे. तातडीने याठिकाणी मदत आणि पुनर्वसनची टीम दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रशासन आणि टीम अलर्ट मोडवर असते. पण या घटनेने नागरीक चांगलेच धास्तावले आहे. कसलीही जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धराली गाव हे गंगोत्री धाम आणि गंगा नदीच्या उगमाच्या अगदी जवळ आहे. या भागात ढगफुटीमुळे लोक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना लागलीच सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. अजून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. कोणत्याही प्रकारची मोठी घटना होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहाकडे जाऊ नये असे आवाहन प्रसासनाकडून करण्यात आले आहेत.
सीएम धामी ने जताया दुख..
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. धराली येथे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले. हे दुःख न पेलवणारं आहे. मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी SDRF, NDRF, जिल्हा प्रशासन आणि इतर मदत कार्य करणारी पथकं शर्थीने प्रयत्न करत आहेत. मी या घटनेवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*