पुणे : बाजारात आवक घटल्याने गेल्या आठवड्याभरापासून भाजीपाला महागला आहे. दरम्यान मे आणि जुन महिन्यात उन्हामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यात अचानक पाणी आटल्याने अनेक पिके पाण्याअभावी जळाली.आता पाऊस सुरु झाल्याने देखील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातही टोमॅटो पेट्रोलपेक्षाही महाग झाले आहेत. अनेक जिल्ह्यात टोमॅटोचे दर कडालेले आहेत संभाजीनगर मध्ये गेल्या चार दिवसांत किलोमागे 40 रुपयांची वाढ झाल्याने शहरात टोमॅटो प्रतिकिलो 140 रुपये दराने विक्री होत आहेत. हा उच्चांक असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.