आजचे राशीभविष्य : आज सोमवार सर्व 12 राशींसाठी आजचा सोमवार कसा असेल? वाचा मेष ते मीन राशीचं राशीभविष्य…

Spread the love

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घ्या ज्योतिषी सरिता शर्मा यांच्या आजच्या राशीभविष्यात.

▪️मेष : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करीत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. मन एकदम ताजेतवाने राहील. आजचा दिवस मित्र आणि नातलगांसह आनंदात जाईल. जवळचा प्रवास होईल. आज हातून एखादे धार्मिक किंवा पुण्य कर्म होईल.

▪️वृषभ : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपण गोड वाणीमुळं इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. अभ्यासात गोडी वाढेल.

▪️मिथुन : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपलं मन द्विधा बनेल. जास्त हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक आणि स्थावर संपत्तीविषयी शक्यतो चर्चा टाळावी. आज शक्यतो प्रवास टाळा.

▪️कर्क : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र आणि नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल.पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी-व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

▪️सिंह : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्र-मैत्रिणी सुद्धा मदत करतील. डोळे आणि दातांच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आज आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल. कार्यात यश मिळवू शकाल.

▪️कन्या : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या गोड बोलण्यामळं आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. सुख, आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.

▪️तूळ : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. नातलगांचे गैरसमज होतील.

▪️वृश्चिक : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी-व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. विशेषतः स्त्री वर्गाकडून फायदा होईल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. सांसारिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

▪️धनू : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मान- सन्मान होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होतील.

▪️मकर : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरास थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही.

▪️कुंभ : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज अनेक विचारांमुळं मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. चोरी, अवैध काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरेल. खर्च वाढल्यामुळं हात आखडता घ्यावा लागेल. मन शांत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

▪️मीन : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल. मेजवानी, सहल ह्यातून मनोरंजन होईल. दांपत्य जीवनाचा भरपूर आनंद मिळेल. वस्त्रे अलंकार, वाहन खरेदी होईल.

🔸️एस्ट्रो सरिता शर्मा -9310820945
🔸️वैदिक, केपी, अंकज्योतिष, मोबाइल अंकज्योतिष, ,जैमिनी, नाडी, टैरो…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page