आजचे राशीभविष्य : मेष, वृषभ राशींना मिळेल कामात पदोन्नती; तर ‘या’ राशींना होणार मोठा आर्थिक लाभ, वाचा राशीभविष्य…

Spread the love

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ आजच्या राशीभविष्यात.

▪️मेष (ARIES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचं यशस्वी नियोजन करू शकाल. दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता होणार नाही. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. स्वकीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल.

▪️वृषभ (TAURUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचं योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतात. एखाद्या रमणीय स्थळी सहलीचं आयोजन करू शकाल.

▪️मिथुन (GEMINI) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगलं राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं असेल. दुपारनंतर शारीरिक, मानसिकदृष्टया अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनप्राप्ती संभवते. कुटुंबात सुख शांती नांदेल.

▪️कर्क (CANCER) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज अवैध आणि निषेधार्ह विचारापासून दूर राहणं हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्यानं शारीरिक, मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपारनंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संततीविषयक चिंता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी झालेल्या वादामुळं आपल्या मनाला दुःख होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणं हितावह राहील.

▪️सिंह (LEO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आरोग्याच्या दृष्टीनं आज आपण प्रसन्न आणि आनंदित राहाल. मित्र आणि संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. दुपारनंतर मानसिक नैराश्य जाणवेल. संतापाची भावना वाढेल. कुटुंबात वादविवाद होऊ नयेत ह्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढल्यानं आर्थिक चणचण भासेल. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावं लागेल.

▪️कन्या (VIRGO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्यानं चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश आणि कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक, मानसिकदृष्टया प्रसन्नता जाणवेल. घरात सुखशांती नांदेल. प्रत्येक कामातून दृढ मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. एखादा प्रवास संभवतो.

▪️तूळ (LIBRA) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्यानं मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता आहे. दुपारनंतर कामे यशस्वी झाल्यानं मानसिक प्रसन्नता लाभेल. आज यश आणि कीर्ती प्राप्त होईल. व्यवसायात चांगले सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

▪️वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आज नवीन वस्त्रे, अलंकार आणि सौंदर्य प्रसाधने ह्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना सहजपणे राबवू शकाल. दुपारनंतर वैचारिक स्थैर्य राहणार नाही. आज नवीन कार्य हाती घेणं हितावह राहणार नाही.

▪️धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र आणि स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल. दुपारनंतर शारीरिक, मानसिकदृष्टया आपण बेचैन राहाल. सौंदर्य प्रासधने, गृहसजावट आणि मनोरंजनाची साधने खरेदी करू शकाल. स्थावर मालमत्ते विषयक कागद पत्रांवर सही करताना काळजी घ्यावी लागेल.

▪️मकर (CAPRICORN) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. नशिबाची साथ मिळेल. एखादा प्रवास संभवतो. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं मनाला आनंद वाटेल.

▪️कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उदभवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. आपण केलेल्या कामाकडं कोणी लक्ष न दिल्यानं आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.

▪️मीन (PISCES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कुटुंबीयांकडून सुख मिळेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page