3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील? जाणून घेऊया राशीभविष्यमधून सविस्तर!
🔹️मेष (ARIES) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या आणि त्यांसंबंधीत गोष्टींचं आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी, द्वेष, भावना यावर आवर घालावा लागेल. शक्यतो नवीन कार्यारंभ करू नये. प्रवासात त्रास संभवतो.
🔹️वृषभ (TAURUS) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भागात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. वैवाहिक सौख्याचा आनंद उपभोगता येईल. अचानक धनलाभ संभवतो.
🔹️मिथुन (GEMINI) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भागात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचं आणि आनंदाचं वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. कामात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचं प्रमाण मात्र वाढेल. विनाकारण संताप व्यक्त केल्यास आपलं काम बिघडण्याची शक्यता आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
🔹️कर्क (CANCER) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भागात असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळं हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. प्रिय व्यक्तीकडून मन दुखावलं जाईल किंवा अबोला धरला जाईल. एकादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावा.
🔹️सिंह (LEO) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भागात असेल. आज आपले शारीरिक, मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आपल्या वक्तव्यानं गैरसमज वाढतील. आपलं मन उदास होईल. आईशी मतभेद होतील आणि तीच्या प्रकृतीची काळजी वाटत राहील. सरकारी आणि मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी.
🔹️कन्या (VIRGO) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भागात असेल. आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावं लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र आणि स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ सुद्धा होतील. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल.
🔹️तूळ (LIBRA) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भागात असेल. आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबियांशी होणारे संभाव्य वाद टाळू शकाल. हट्टीपणा सोडून सर्वमान्य मार्ग स्वीकारणे हितावह राहील.
🔹️वृश्चिक (SCORPIO) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आनंददायी बातमी समजेल. प्रवास सुखद होतील.
🔹️धनू (SAGITTARIUS) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भागात असेल. आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल आणि दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. मनाचा अतीउत्साह आवरावा लागेल. एखादा अपघात संभवतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. पैसा खर्च होईल.
🔹️मकर (CAPRICORN) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. मित्राचा सहवास घडल्यानं आजचा दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार आणि इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. विवाहेच्छुकांना जोडीदाराची निवड सहजपणे करता येईल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. घरात एखादे मांगलिक कार्य होईल.
🔹️कुंभ (AQUARIUS) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळं बढती मिळण्याची शक्यता आहे. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. धनप्राप्ती होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल.
🔹️मीन (PISCES) :
वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळं त्रस्त व्हाल. शरीरास थकवा आणि आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीची काळजी राहील. शक्यतो महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. व्यापारात अडचणी येतील. मनात नकारात्मक विचार येतील.