
लंडन- लॉर्ड्स कसोटी सामना जिंकण्याची संधी भारताने हातची घालवली. इंग्लंडने दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव पत्त्या सारखा कोसळला. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली मात्र ती अपयशी ठरली. अखेर इंग्लंडने हा सामना 22 धावांनी जिंकला आहे.
भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी चार विकेट गमावल्या होत्या. त्याच वेळी इंग्लंडने सामन्यावर आली पकड मजबूत केली होती.सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने आपल्या गोलंदाजीची धार आणखी तिव्र केली. ज्यांच्यावर सामन्याची भिस्त होती त्यांनाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी बाद केले. आधी ऋषभ पंत,नंतर के.एल. राहुल त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला बाद करत इंग्लंडने सामन्यावर आपली पकड अधिकच भक्कम केली. रविंद्र जडेजा आणि नितीश रेड्डी यांच्यात चांगली भागिदारी झाली होती पण ख्रिस व्होक्सने रेड्डीला बाद करत सामना जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि बुमराह यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. बुमराह तब्बल 54 चेंडू खेळला.

त्याने पाच धावा केल्या पण त्याला बेन स्टोकने आऊट केले. त्यानंतर जडेजाने भारताच्या विजयाची अपेक्षा जिवंत ठेवली होती. पण महम्मद शिराज दुर्दैवी पणे बाद झाला. भारताचा डाव 170 धावात आटोपला. इंग्लंडचा 22 धावांनी विजय झाला. शिवाय पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने दोन एक अशी आघाडी ही घेतली आहे. रविंद्र जाडेजा 61 धावांवर नाबाद राहीला. त्याने एकाबाजून भारताची बाजू लावून धरली होती. या 61 धावा बनवताना त्याने तब्बल 181 चेंडूंचा सामना केला. भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण त्याच वेळी शिराज दुर्दैवीपणे बाद झाला. जाडेजाची एकाकी झुंज अपयशी ठरली. जाडेजा शिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर ठाण मांडता आले नाही.
🎤जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर