“टायगर अभी जिंदा है”;आमदार भास्कर जाधव यांचा ठाम निर्धार; शिवसेनेच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Spread the love

चिपळूण : “टायगर अभी जिंदा है” या दमदार घोषणेसह आमदार भास्कर शेठ जाधव यांनी शिवसेनेच्या तालुका मेळाव्यात उत्साहात भाषण करत उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. या वेळी त्यांनी उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम, तालुका समन्वयक सुधीर भाऊ शिंदे, तालुका प्रमुख बळीराम गुजर, ज्येष्ठ शिवसैनिक राजू शेठ भागवत यांचे तसेच संपूर्ण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनामध्ये उपशहर प्रमुख सचिन (भैया) कदम, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, सचिव प्रशांत मुळे व सचिन शेटे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्यासह असंख्य शिवसैनिकांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला.
मेळाव्यात स्थानिक प्रश्न, संघटनेची मजबुती, आगामी निवडणुका आणि शिवसेनेचा पुढील लढा या विषयांवर सखोल चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली निष्ठा अधोरेखित केली.
या मेळाव्याच्या निमित्ताने चिपळूणमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा जोरदार दबदबा जाणवला आणि ‘टायगर’ अजूनही ताकदीने उभा असल्याचा संदेश जनतेला मिळाला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page