गुहागर/ वार्ताहर – गुहागर तालुक्यातील वैद्यकीय सेवेतील एक अग्रगण्य नाव असणारे संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम, गुहागर यांनी गोरगरीब गरजू लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी कोरोना पासून काम चालू केले. आता त्यांचा काम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विस्तारलं आहे. गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय टीम आधार बनली आहे. याचप्रमाणे श्रीमती.प्रमिला पिल्ये, वय- ६२, गाव गणपतीपुळे रत्नागिरी येथील हे रुग्ण जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे ऍडमिट करण्यात आले होते.
या रुग्णाचे हॉस्पिटलचा बिल ३ लाख ३४ हजारच्या वरती झालं होत. हॉस्पिटलचे कोटेशन ७ लाख होते. रुग्णाला सरकारी हॉस्पिटलला ऍडमिट करायचं होत. बिल भरल्याशिवाय हॉस्पिटल मधून सोडत नव्हते म्हणून श्री.मनोज शिंदे (चिंद्रावले- गुहागर) यांच्या मार्फत संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम कडे हा विषय आला.
वैद्यकीय टीम रुग्णसेवक श्री.मनोज डाफळे, व चिंद्रवले गाव संपर्क प्रमुख श्री सुनिल डाफळे यांनी मोलाचे सहकार्य करत समाजसेवक संतोष दादा जैतापकर यांच्या मार्फत स्थानिक आमदार मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या कडे विषय संपर्क करून सविस्तर माहिती दिली व मंत्री महोदय मोलाचे सहकार्य करत हॉस्पिटलला संपर्क करून सहकार्य करावे अशी विनंती केली आणि हॉस्पिटलने दोन लाखापेक्षा जास्त बिल माफ केले. संतोष दादा जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमने केलल्या सहकार्य बद्दल रुग्णांच्या नातेवाईक यांनी वैद्यकीय टीम व श्री मनोज शिंदे यांचे आभार मानले. वैद्यकीय टीम मार्फत रुग्णसेवक मनोज डाफळे, काशीराम पास्टे, संदीप खैर, अविनाश माटल, महेंद्र आंबेकर, मितेश घडशी, तेजस फटकरे, व चिंद्रवले गाव संपर्क श्री सुनिल डाफळे यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.