
*रत्नागिरी :* रत्नागिरी तालुक्यातील पाली साठरेबांबर भराडीवाडी येथील रस्त्यावर झालेल्या बाचाबाचीतून ४ जणांनी प्रसाद अनंत कशेळकर यांना रस्ता अडवून शिवीगाळ करत गाडून टाकीन अशी धमकी दिली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात शनिवारी रात्री ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद अनंत कशेळकर (वय ४०, श्रीराम नगर नाचणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी गणेश दीपक चव्हाण, राहुल रामचंद्र चव्हाण, रेश्मा रामचंद्र चव्हाण, योगिता रामचंद्र चव्हाण (सर्व रा. साठरेबांबर, भराडीनवाडी, पाली) यांनी मनात राग धरुन प्रसाद यांना रस्ता अडवून शिवीगाळ केली. त्यांनी आपल्या साठरेबांबर पाली येथे आजोळी नवीन घर बांधलेले असून त्या घराचे रंगकाम चालू असल्याने पाहण्याकरिता आले असता ही घटना घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संशयित सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६ (२), २९६, ३५६ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.