
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या या पाच मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पाचही युवक युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवाशी आहेत. एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात बूडून पाच तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुण पर्यटक आज शनिवारी तलावात पोहायला गेले होते. तलावात पोहायला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपुरातील या दुर्देवी घटनेतून एका तरुणाचा जीव वाचला आहे. सर्व तरुण हे चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत. तलावात बुडून मृत्यू झालेल्या मृत तरुणांची नावे देखील समोर आले आहेत.
चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे तरुण पर्यटनासाठी घोडाझरी तलावाजवळ गेले होते. तरुण तलावात पोहायला गेले. तलावात पोहायला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पर्यटकांपैकी ५ जणांचा बुडून मृत्यू झाला. जनक गावंडे, यश गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे अशी मृत तरुणांची नावे आहेत. त्यांच्यातील एक जण वाचला आहे. पाच जणांच्या मृत्यूने साठगाव कोलारी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. ५ तरुणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तसेच या घटनेने साठगाव कोलारी परिसरात शोककळा पसरली आहे.